---Advertisement---

Infinix Hot 60 5G+ स्मार्टफोन झाला लाँच, iQOO-Poco ला देणार टक्कर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

On: Wednesday, July 16, 2025 6:10 PM
Infinix Hot 60 5G+
---Advertisement---

Infinix Hot 60 5G+ smartphone launched: इन्फिनिक्सने त्यांच्या बजेट हॉट सिरीजमधील नवीन Infinix Hot 60 5G+ स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच केला आहे. 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच झालेल्या या नवीन 5जी फोनमध्ये वन टॅप एआय बटण, नेटवर्कशिवाय कॉल आणि एआय सर्कल टू सर्च अशा खास फीचर्सचा समावेश असणार आहे.

तर तुम्ही कमी किंमतीत नवीन 5G+ स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इन्फिनिक्स कंपनीचा हा फोन खरेदी करा. चला तर मग आजच्या या लेखात आपण हा फोन खरेदी करण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील, सेल कधी सुरू होईल आणि हा फोन कोणत्या फीचर्ससह आणला गेला आहे? चला जाणून घेऊया.

Infinix Hot 60 5G+ ची भारतातील किंमत

या इन्फिनिक्स स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 10,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे, या किमतीत तुम्हाला 6 जीबी / 128 जीबी व्हेरिएंटचा हा फोन खरेदी करता येणार आहे. तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच झालेल्या या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 17 जुलैपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

स्पर्धा

या किंमत रेंजमध्ये, हा इन्फिनिक्स ब्रँड फोन Lava Storm Play (किंमत 9,999रुपये), iQOO Z10 Lite (किंमत 10,998 रुपये) आणि Poco M7 (किंमत 9,299 रुपये) या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

Infinix Hot 60 5G+ स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.7-इंचाचा एचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

चिपसेट: Infinix Hot 60 5G Plus मध्ये MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे जो ड्युअल मोड व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

बॅटरी: या फोनमध्ये 5200mAh ची पॉवरफूल बॅटरी आहे जी बायपास आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

हा फोन अल्ट्रालिंक कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतो, या फीचरचा फायदा असा आहे की तुम्ही नेटवर्क नसलेल्या किंवा कमी नेटवर्क असलेल्या भागातही सहजपणे कॉल करू शकाल, परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे फीचर फक्त इन्फिनिक्स ते इन्फिनिक्स स्मार्टफोन दरम्यान काम करेल.