---Advertisement---

Pune: एमआयटी-डब्ल्यूपीयू ‘निर्मिती २०२६’चे उद्घाटन उद्या; शांतीलाल कटारिया मुख्य अतिथी, १.५ लाखांचे बक्षीस

On: Tuesday, April 7, 2026 7:58 PM
Pune: एमआयटी-डब्ल्यूपीयू 'निर्मिती २०२६'चे उद्घाटन उद्या; शांतीलाल कटारिया मुख्य अतिथी, १.५ लाखांचे बक्षीस
---Advertisement---

Pune News: ‘भारतातील मेगा स्ट्रक्चर्सचा उदय’ या थीमवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने ‘निर्मिती २०२६’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ८ एप्रिल रोजी पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी-डब्ल्यूपीयू कॅम्पसवर सुरू होणार असून ९ एप्रिल रोजी समाप्त होईल.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सीआरईडीएआय सदस्य शांतीलाल कटारिया हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. शांतिनी बोकील, प्रा. डॉ. रोहित साळगुडे आणि डॉ. प्रवीण मिंदे यांची उपस्थिती राहणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या निर्देशानुसार आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आदित्य होळे आणि त्यांच्या टीमने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

‘निर्मिती २०२६’ मध्ये पेपर प्रेझेंटेशन, टेक्नो क्विझ, ‘बॉब द बिल्डर’, बॉक्स क्रिकेट, ट्रेझर हंट, सीव्ही क्रक्स आणि ई-टेंडरिंग अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत. विजेत्यांना एकूण १.५ लाख रुपयांच्या बक्षिसांची रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमास भेट देणार आहेत. याशिवाय मगरपट्टा सिटीचे संस्थापक अध्यक्ष सतिश मगर यांचा विशेष भेट देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.