Samsung च्या Samsung Galaxy S24 या प्रीमियम स्मार्टफोनवर सध्या मोठी सूट दिली जात आहे. कंपनी पुढील आठवड्यात नवीन Samsung Galaxy S26 सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जुन्या मॉडेल्सच्या किंमती कमी करण्यात आल्या असून Galaxy S24 वर 30,000 रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. दमदार कॅमेरा आणि आकर्षक डिझाइन असलेला हा फोन आता कमी किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा Dynamic LTPO AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तसेच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass Victus 2 चे संरक्षण दिले आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असून Adreno 750 GPU सोबत तो काम करतो.
कॅमेराच्या बाबतीतही हा फोन मजबूत आहे. यात मागील बाजूस 50MP, 12MP आणि 10MP असे तीन कॅमेरे आहेत, तर सेल्फीसाठी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4000mAh बॅटरी असून ती 25W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन भारतात 74,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च झाला होता. मात्र सध्या Amazon वर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला Onyx Black व्हेरिएंट 30,000 रुपयांपेक्षा जास्त सूटनंतर 42,170 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच 1,265 रुपयांचा कॅशबॅकही दिला जात आहे. त्यामुळे या फोनची प्रभावी किंमत सुमारे 41,000 रुपये होते. या किमतीत हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.
दरम्यान, Google नेही आपल्या Google Pixel 9a ची किंमत कमी केली आहे. Pixel 10a लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने Pixel 9a च्या किमतीत 10,000 रुपयांची कपात केली आहे. हा फोन 49,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता, पण आता तो 39,999 रुपयांना खरेदी करता येतो.
नवीन मॉडेल्सच्या लॉन्चमुळे जुन्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती मिळत असून ग्राहकांसाठी ही एक चांगली खरेदीची संधी मानली जात आहे.








